मुंबई 25 मार्च : काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्षरणजितसिंह निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई एका कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करतील. भाजप त्यांना माढ्यातून तिकीट देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढ्याच्या लढतीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. भाजपमध्ये गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे उमेदवार असतील असं बोललं जात होतं. मात्र त्यांना भाजपने कुठलं आश्वास दिलं याचं गुढ कायम आहे.
राष्ट्रवादीने माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे हे राष्ट्रवादीचेच असले तरी भाजपच्या मदतीने त्यांनी जिपचं अध्यक्षपद मिळवलं होतं. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील किंवा सुभाष देशमुख यांना तिकीट दिलं तरच तिथे तुल्यबळ लढत होऊ शकते असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे.
निंबाळकरांना भाजपने तिकीट दिल्यास माढ्यात राष्ट्रवादीचे पारडे जड राहू शकते. त्याचबरोबर मोहिते गटाचे कार्यकर्तेही नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
चुरस वाढणार?
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसत आहे.
शरद पवारांनी डाव टाकत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मग भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा होती. पण त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव चर्चेत आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours