बीड, 25 मार्च : 'जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची सभा रद्द करण्यासाठी आचार संहितेत पोलीस प्रशासनावर दबाव टाकून भाजपाचे पदाधिकारी काम करत आहेत' असा आरोप बीडमधील राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून करण्यात आला आहे.
'एकाच दिवशी दोन सभा आणि दोन रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे. तेदेखील वेगवेगळ्या पक्षाला द्यायला नको होत्या. मात्र भाजपा सत्तेचा दबाव टाकून आचार संहितेत प्रशासनाचा वापर करवून घेतं आहे' अशी टीका करत आपण याविरोधात तक्रार करणार आल्याचे बजरंग सोनवणे यानी सांगितलं आहे. इतकंच नाही तर पंकजा मुंडे सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

बीड लोकसभा निवडणूक तशी मुंडे बंधू भगिनींच्या प्रतिष्ठा आणि परीक्षा पाहणारी आहे. यातच दोन्ही पक्ष एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांत बीड शहरात दोन सभा आणि दोन रॅली आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे पोलीस प्रशासनांसमोर शांतता राखण्याचं मोठं आव्हान आहे.
पण यासगळ्यात राष्ट्रवादीला सभा रद्द करावी लागल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे उमेदवारांनी आक्षेप घेत आम्ही 25 तारखेच्या सभा आणि रॅलीची परवानगी 19 तारखेलाच संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करून आचारसंहितेचं पालन करत परवानगी घेतली होती. मात्र दबाव टाकून ती परवानगी भाजपला दिली असल्याचा आरोप केला जात आहे.
भाजपाने 24 तारखेला उशिरा सभेची परवानगी घेतली. मात्र आमची परवानगी असताना भाजपला सभेला परवानगी दिली. सोमवारी हजारो कार्यकर्ते एकत्रित आले तर लॉयन ऑर्डरची परिस्थिती निर्मान होईल. मात्र सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तसंच या दबाव तंत्राच्या आणि हिटलर शाहीच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours