बीड, 16 मार्च : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना आता त्यांच्या होम ग्राऊंडवर दुहेरी सामना करावा लागणार आहे. कारण, भाजपसोबत सत्तेत असलेले शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मात्र बीडमध्ये पंकजा मुंडेंना थेट विरोध केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि विनायक मेटे असं दुहेरी आव्हान आता पंकजा मुंडेना पेलावं लागणार आहे. पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात अनेक मुद्यांवरून मतभेद आहेत. मी राज्यात भाजपसोबत असेन पण, बीडमध्ये नाही असा पवित्रा मेटे यांनी घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

शिवसंग्रामच्या वतीनं बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंविरोधात आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. बैठकीदरम्यान त्यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधला. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये 'निष्क्रिय राजा प्रजेच्या काय फायद्याचा?' 'कुणी दिल्लीचे स्वप्ने पाहू नयेत' अशी चर्चा देखील रंगली. विनायक मेटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत.
2014च्या लोकसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष होता. त्यावेळी त्यांनी बीडमधून विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. पण, त्यांना पंकजा मुंडेंसोबत असलेल्या वादाचा फटका त्यांना बसला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours