मुंबई, 15 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरातील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी (14 मार्च)संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेस कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
सीएसएमटीकडून 'टाईम्स आॅफ इंडिया'कडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळला. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झाहीद खान (वय 32), तपेंद्र सिंग (वय 35), अपूर्वा प्रभू (वय 35 ), रंजना तांबे (वय 40) आणि सारिका कुलकर्णी ( वय 35) यांचा समावेश आहे. या परिसरात संध्याकाळच्या वेळेस अतिशय गर्दी असते. हा पूल कोसळल्यानंतर येथे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमींना जे.जे. हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि सेंट जाॅर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours