मुंबई 1 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. पराभव दिसत असल्यानेच मोदींनी पवारांवर टीका केली असा पलटवार राष्ट्रवादींच्या नेत्यांनी केला आहे. मोदींच्या या टीकेनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते मोदी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली. मोदींनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वर्धा येथून केला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours