मंगळवेढा, 2 एप्रिल: सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख व जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते-पाटील हे सध्या भाजपाच्या वाटेवर असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गोपनीय बैठक झाली असून लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.
धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोमवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मंगळवेढा येथे भेट घेतली, त्यावेळी त्यांच्या सोबत आ. प्रशांत परिचारक व शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. येथे तासभर झालेल्या बंद खोलीत झालेल्या चर्चेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर धवलसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नव्हता, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours