पुणे, 02 एप्रिल : काँग्रेसमधून पुण्याच्या जागेवर प्रवीण गायकवाड उमेदवार अशा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांच्या पत्ता कट करण्यात आला आहे तर गायकवाडांऐवजी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गायकवाड यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली हायकमांडने त्यांना पुण्यातून उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील काँग्रेस नेते आणि पुण्यातील नेत्यांचा गायकवाड यांना उमेदवारी देण्यासाठी विरोध होता. पण गायकवाडांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते. पण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या शब्दाला मान देत अखेर प्रवीण गायकवाड यांचा पत्ता कट केला आहे.
पुण्यात काँग्रेसकडून चर्चेत असणाऱ्या उमेदवारांच्या नावांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर होते. ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अरविंद शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. पुणे काँग्रेसचे मोहन जोशी यांची वर्णी लागेल, असं सुरुवातीला बोललं गेलं आणि त्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

दरम्यान, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचंही नाव मध्यंतरी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून चर्चेत होतं.  या सगळ्यांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कोण आहेत प्रवीण गायकवाड?
- शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड यांचे थेट वंशज.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours