मुंबई: मनसेचे् अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजपची चांगलीच पोलखोल केली. आता भाजपनेही काॅपी पेस्ट करत मनसेला जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. 
भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपसुद्धा 'लाव रे तो व्हिडिओ' करणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 27 तारखेला भाजपकडून मनसेच्या विरोधात व्हिडिओ लावून राज ठाकरे यांचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचंही विनोद तावडे यांनी सांगितलं.
विनोद तावडे म्हणाले की, 'महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या सभेत राज ठाकरे यांचनी जे मुद्दे मांडले आहे. त्याची वास्तविकता एकत्र करून सभेत दाखवण्यात येणार आहे.'

तसंच हरिसाल गावातील उपसंरपचाने फेसबूक लाईव्हकरून राज ठाकरे यांचे मुद्दे खोडून काढले आहे. आता हे सगळे व्हिडिओ आम्ही 27 एप्रिलला 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत उत्तर देणार आहोत असंही तावडे यांनी सांगितलं. 
विशेष म्हणजे, भाजपच्या कामांची पोलखोल राज ठाकरेंकडून सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मदत होईल अशा पक्षांना मतदान करू नका असं आवाहनही राज ठाकरे करत आहे. त्यामुळे आता भाजपही पलटवार करणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे सभा युद्ध चांगलेच पेटणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours