मुंबई, 07 एप्रिल: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या बैठकीत क्षीरसागर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप आला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours