उस्मानाबाद, 07 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. देशातील विविध राज्यात मोदी प्रचार घेत आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी PM मोदी राज्यात सभा घेत आहेत. मोदींच्या राज्यात आतापर्यंत 3 सभा झाल्या आहेत. आता तिसरी सभा 9 एप्रिल रोजी औसा येथे होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे याआधी मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र योग जुळून आला नव्हता. आता उस्मानाबाद मतदारसंघाच्या प्रचारासाठी मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. याआधी नांदेड येथील सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. नांदेडमध्ये मोदींनी भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि ओमर अब्दुला यांच्यावर सडकून टीका केली होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours