मुंबई, 13 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची धामधुम सध्या जोरात सुरू आहे. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीचं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे 'बविआ'ला मोठा धक्का बसला आहे. पालघरमध्ये बहूजन महापार्टीच्या उमेदवारानंही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहूजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टानं वाद निवडणूक आयोगाकडे सोपवत निर्णयाचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण, पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते आणि ‘मातोश्री’चे चाणक्य यांनी किल्ला लढवला. दरम्यान, पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कुणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहूजन विकास आघाडीला बसणार आहे. तर, फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours