मुंबई, 24 एप्रिल : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. पहाटेच्या वेळी मानखुर्द स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेल ते सीएसएमटी वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. यामुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. कार्यालय गाठण्याच्या वेळेसच हा बिघाड झाल्यानं प्रवासी संतापले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours