नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने 303 जागांवर आघाडी घेतली आहे. 2014मध्ये आलेल्या मोदी लाटेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 50 जागांवर आघाडी आहे. निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच अंदाज खरा ठरेल अशा पद्धतीने कल येत आहेत. 2014मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मोदींनी पुन्हा एकदा असाच विजय मिळवला आहे. देशातील जनतेने 1984नंतर एखाद्या पक्षाला प्रथमच इतके मोठे यश मिळवले आहे. 84मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना जनतेने मोठा कौल दिला होता.
निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आयोगने दिलेल्या माहितीनुसार 5 वाजेपर्यंत भाजपने 303 आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षानंतर शिवसेनाने 18 जागांवर आघाडी घेतली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours