मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईतील लढत ही चुरशीची होईल असा राजकीय निरिक्षकांचा कयास होता. पण, सारे अंदाज खोटे ठरवत शिवसेनेचे गजाजन कीर्तिकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी मुंबई काँग्रसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा पराभव केला आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्याआधी 2009 मध्ये गुरुदास कामत हेच खासदार झाले होते. गुरुदास कामत यांचं 22 ऑगस्ट 2018 ला निधन झालं. त्यानंतर संजय निरूपम यांना काँग्रेसनं रिंगणात उतरवलं होतं. पण, जनतेनं मात्र निरूपम यांना नाकारलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours