भोपाळ, 7 मे : लोकसभा निवडणूक 2019 मुळे देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरूच आहे. अशातच भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही 'आर या पार'ची लढाई आहे. तर दुसरीकडे भाजपनं आपला गड कायम टिकवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
प्रज्ञा ठाकूर यांना जिंकवण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार भाजपकडून दिग्विजय सिंह यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. जेथे-जेथे काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्या-त्या ठिकाणांवर अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये भाजप आपलं लक्ष्य केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यातील प्रचारची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांभाळणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours