वाशिम- तालुक्यातील चिखली बु इथं दिनकर संभाजी घुले या 55 वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दिनकर घुले या शेतकऱ्याकडे 2 हेक्टर शेती असून दुष्काळामुळे शेतीमध्ये कमी उत्पादन झाले. तसेच त्यांच्यावर 1 लाख रुपयांचं स्टेट बँकेचं कर्ज असल्याचं समजते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे दिनकर घुले यांना मागील काही दिवसांपासून पैशांची चिंता सतावत होती.सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने या शेतकऱ्याने कुटुंबातील कुणी नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.
तरुण शेतकऱ्याने राहत्या घरीच लावला गळफास

गेल्या आठवड्यात कारंजा तालुक्यातील वापटी येथील संतोष यशवंत लव्हाळे (वय-32) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संतोष लव्हाळे या शेतकऱ्याकडे कूपटी येथे गट क्र. 165 मध्ये 1.51 हेक्टर शेती आहे. तो मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या डोक्यावर बँका तसेच खासगी सावकारचेही कर्ज होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह खरीपाच्या पेरणीची चिंता संतोषला सतावत होती. या नैराश्यामुळे संतोष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना निवडणूक आचरसंहितेचं कारण देत प्रशासनानं दुष्काळाकडं डोळझाक केली. मात्र, विरोधकांच्या दुष्काळ दौऱ्यानंतर सरकारला जाग आली आहे. पालक सचिवांचे दुष्काळी दौरे सुरु झालेत. मात्र बळीराजांची परवड काही थांबलेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours