मुंबई, 17 मे : लोकसभा निवडणुकीत सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. या शेवटच्या टप्प्यात 8 राज्यांतील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. 
सातव्या टप्प्यातील मतदान –
बिहार – 8 जागा, झारखंड – 3 जागा, मध्यप्रदेश – 8 जागा, पंजाब – सर्व 13 जागा, पश्चिम बंगाल – 9 जागा, चंदीगढ – 1 जागा, उत्तरप्रदेश – 12 जागा, हिमाचल प्रदेश – 4 

काय आहे स्थिती?
बिहार – काँग्रेस-जनता दलाचं भाजप समोर मोठं आव्हान, शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळे निवडणुकीत रंगत.
झारखंड – जागा राखण्याचं भाजपासमोर आव्हान, आदिवासी भागातला भाजपाचा दबदबा कायम राहणार का? कोळसा आणि खाण पट्यात कोण बाजी मारणार?
मध्यप्रदेश – 2014 चा करिष्मा कायम राखण्याचं भाजपासमोर आव्हान, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सरकारची पहिली परीक्षा
दरम्यान, लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हलचालांनी वेग आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.
या बैठकीसाठी वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी, डीएमके प्रमुख एम.के.स्टॅलिन यांना बोलवण्यात आले आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours