मुंबई, 5 मे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना संपादकीय'मधून देशातही 'बुरखा बंदी'ची मागणी केली होती. या मागणीवर चौफर टीका झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बुरखा बंदीसंदर्भात त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षातच वादळ निर्माण झालं होतं. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाराजीला संजय राऊत यांना सामोरं जावं लागलं. यानंतर शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी बूरखा बंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेत एकटे पडलेल्या संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात सपशेल माघार घेत, बुरखा बंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच बूरखा बंदीची भूमिका ही केवळ सामाजिक जाणीवेतून केल्याची सारवासारवही त्यांनी 'रोखठोख'मधून केली आहे.

संजय राऊत यांचं 'रोखठोक'मध्ये स्पष्टीकरण

- ऐन निवडणुकीत दोन गोष्टींचे राजकारण झाले. मसूद अझरला जागतिक दहशतवादी असल्याचे ‘युनो’ने घोषित करताच येथे काँग्रेससारख्या पक्षाने फारसा आनंद व्यक्त केला नाही. मसूदवरील विजयामुळे हिंदू मते मोठ्या प्रमाणात मोदींकडे वळतील ही त्यांची भीती. दुसरी गोष्ट श्रीलंकेतील ‘बुरखाबंदी’ निर्णयाची.
- बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, ‘बुरखाबंदी’ची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय.
- तिहेरी तलाकबाबतही शिवसेनेची भूमिका सामाजिक सुधारणेची जास्त व धार्मिक कमी अशीच आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours