नवी दिल्ली, 28 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठे बहुमत मिळवले. मोदींचा 30 मे रोजी शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी राजधानीत सुरु आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी बिम्सटेक (BIMSTEC)मधील सर्व प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी सांगितले. 
पंतप्रधान मोदींनी 2014च्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील शपथविधी कार्यक्रमात सार्क देशातील नेत्यांनी बोलवले होते. तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ देखील उपस्थित होते. पण यावेळी भारताने पाकिस्तानशी अंतर ठेवले आहे. मोदींनी यावेळी पाकिस्तानला शपथविधीसाठी आमंत्रण पाठवले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एअर स्ट्राईक करुन उत्तर दिले होते. 
मोदींच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलवले जाणार आहे. यात दक्षिणेतील अभिनेते आणि काही महिन्यांपूर्वीच राजकारणात आलेले कमल हासन यांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय टीआरएस प्रमुख केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना देखील बोलवण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे मोदी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली तर रेड्डी देखील त्याच दिवशी दुपारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours