चिंचवड, 28 मे: लठ्ठ असल्याच्या कारणाने सतत टोमणे देणाऱ्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे.

मुळची फलटणची रहिवासी असलेली प्रियांका पेटकर हिचा चार वर्षांपूर्वी केदार पाटेकर याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून प्रियांकाला तू जाड आहेस, घटस्फोट घे, माहेरातून पैसे घेऊन ये अशा पद्धतीने त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केली. लठ्ठ असण्यावरून वारंवार टोमणे व दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी पती केदार पाटेकर आणि त्याच्या आई-वडिलांसह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours