श्रीनगर, 1 जून : जम्मू काश्मीरच्या त्राल येथे शुक्रवारी (31 मे)पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. येथे सीआरपीएफ 180 बटालियनच्या कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देखील दिलं. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेला एक स्थानिक तर दुसरा परदेशी दहशतवादी होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर काश्मीर खोऱ्यातील हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात तीव्र स्वरूपातील मोहीम राबवली जात आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours