आसनगाव, 27 जून: आसनगाव रेल्वे स्थानकात आज एका प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला आहे. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पूल वापरण्याऐवजी रेल्वे रुळ ओंलांडणं प्रवाशाच्या जीवावर बेतलं असतं. आसनगाव रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी एक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात ट्रेन आली. तेव्हा क्षणाचाही वेळ न लावता हा प्रवासी रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत शिरला. सुदैवानं भरधाव एक्स्प्रेस त्यांच्या इंचभर अंतरावरुन धडधडत निधून गेली. पण प्रवाशाला साधं खरचटलंही नाही.. त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचावला. मात्र दरवेळी दैव साथ देईलच असं नाही. त्यामुळे रेल्वे रुळ न ओलांडता पुलाचा वापर करावा.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours