श्रीनगर, 10 जून : दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यानं ऑपरेशन ऑल आऊट आणखी कठोर केलं आहे. आतापर्यंत ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय जवानांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर दहशतवाद्यांनी आपली ठिकाणं बदलली. पण, त्यांच्या गुप्त ठिकाणांचा शोध देखील घेण्यास देखील भारतीय सैन्याला यश आलं आहे. किश्तवाडमधील केशवान भागात दहशतवाद्यांनी डोंगर पोखरून बोगदा तयार केला होता. त्यामध्ये ते वास्तव्य करत होते. पण, सैन्याच्या 26 राष्ट्रीय रायफल तुकडी आणि पोलिसांच्या विशेष पथकानं दहशतवाद्यांचं हे ठिकाण देखील उद्धवस्त केलं आहे. सैन्यानं कारवाई करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी ठिकाणाहून पळ काढला होता. यावेळी सैन्यानं शस्त्रास्त्र आणि खाण्याचं सामान ताब्यात घेतलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours