मुंबई, 31 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर होते.
हराजेंची 'ती' खंत
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मतदारसंघात त्रास दिला जात असल्याची माहिती आपण पवार साहेबांनी दिली असल्याची खंत शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली होती. तसंच मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. पण भाजप प्रवेश निश्चित करणार असल्याचं सांगत त्यांनी सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला.
Post A Comment:
0 comments so far,add yours