मुंबई, 18 जुलै: मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या पुढील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस घसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंत्योदय एक्स्प्रेस ही गाडी घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिसकडे येणारी गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा-इगतपूरी दरम्यान घसरल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. ही घटना मध्य रात्री 3.50च्या सुमारास घडली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यामुळे मध्य रेल्वेची अप आणि मध्य लाईन विस्कळीत झाली आहे. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours