रिपोर्टर... विलास केजरकर
शहर प्रतिनिधी
दि. २८/७/२०१९ ला सकाळी ८ वाजे राष्ट्रीय वृक्ष दिनानिमित्त्या मानव मंदीर , मानव मंदीर पेवर ब्लॉक परिसरात वृक्ष लावण्यात आली व वृक्ष सुरक्षेसाठी ट्री गार्ड लावण्यात आले.
या कार्यक्रमाला गणेशपुरे येथील सरपंच मा. मनीष गणवीर , उपसरपंच मा धनराज मेहर, भंडारा पंचायत समितीचे उप सभापती सौ वर्षां साकुरे , ग्रामपंचायत गणेशपूरचे सदस्या सौ संध्य बोडेले , सविता गोखले, सदस्य गोवर्धन साकुरे भोवते उपस्थीत होते त्याच प्रमाणे मानव मंडळाचे अध्यक्ष मा रामनाथजी सोनकुसरे, कार्याध्यक्ष सूर्यकांत इलमे , कार्यकर्ता श्रीमती सुलभाताई ताराचंद इलमे, सचिव अजय साखरकर कोषाध्यक्ष पुंडलिक ऊके , राजकुमार वडे, प्रवीण मडामे व सर्व सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रीय वृक्ष दीना निमित्य सेवकांनी काही झाडे दत्तक घेण्यात आली, मंडळाचे अध्यक्ष मा रामनाथजी सोनकुसरे यांनी असच वृक्ष रोपन दरवर्षी घेण्यात येईल असं सांगितलं व सदर झाडाचे एक वर्ष संगोपन केल्यास पूढील वर्षी राष्ट्रीय वृक्षलागवडीच्या दिवशी एक हजार रुपये बक्षीस देन्यात येईल असे मानव मंदिराच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व परमात्मा एक सेवक, सेविका गावकरी मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सह सचिव प्रमोद कटनकार यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours