धुळे, 26 जुलै : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण घरकुल घोट्याळ्याप्रकरणी तुरुंगात असतानाच देशमुख यांच्यावर आणखी एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत देशमुख यांच्यावर द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. त्यानंतर आता ACB ने केलेल्या चौकशीत देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचं उघड झालं आहे. सहाय्यक निबंधक यांच्या आदेशानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घरकुल घोट्याळ्यात देशमुख जामीन मिळाला तरी भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने याप्रकरणी त्यांना अटक होऊ शकते.

हेमंत देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सध्या घरकुल प्रकरणात देशमुख पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यात तुरुंगाबाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख यांना अटक निश्चित आहे.

दरम्यान, दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्याप्रकरणी  हेमंत देशमुख यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली. डॉक्टर देशमुख अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा न्यायालयाने डॉ देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता. तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यानंतर डॉक्टर देशमुख कारवाई पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत होते. मात्र अखेर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव घरकुल घोटाळ्या प्रमाणेच राजकीय दबावाला बळी न पडता माजी मंत्री डॉक्टर देशमुख यांच्यावरती खटला चालवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

2016 साली या गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, 3 तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, 3 तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास 15 कोटींचा व्यवहार केला होता.

घरकुल योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे हे सदस्य होते म्हणून त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली  तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही , याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण 10 आरोपी करण्यात आले गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष , 3 मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरता जामीनावर आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours