( शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रु.नुकसान भरपाई देण्याचे ही निवेदनात मागणी केली) 
जिल्हा प्रतिनिधी: शमीम आकबानी 
-----साकाेली- भंडारा जिल्हा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणुन सर्वत्र आेळखला जाताे.मागील दिड महिन्यापासुन जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही . शेतकरी हा हवालदिल झालेला असुन जवळपास ८०% टक्के शेतकऱ्यांचे राेवने सुद्धा झालेले नाहीत ज्या शेतकऱ्याकडे कृषिपंपाची व्यवस्था आहे त्यांचे राेवने थाेडेप्रमाणात झालेले असुन त्यांचे कडे अपुरी विज व्यवस्था असल्यामुळे त्यांना धान जगविने फार कठिण झालेले आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यात सदृश्य परिस्थिती निर्माण हाेऊन शेतकरी रडकुडीस आलेला आहे. व शेतकरी कर्जबाजारी हाेऊन आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त झालेला दिसताे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांकरिता  सदर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्रि महाराष्ट्र राज्य यांना आज दि. २५-७-२०१९ राेजी शेतकरी संकटमाेचन संघटनेचे संयाेजक डॉ.अजयराव तुमसरे यांच्या नेतृत्वात दिला गेला आहे .या निवेदनात कृषिपंपाचे भारनियमण कमी करुन ८ तास ऐवजी १६ तास विज देण्यात यावे,भारनियमण दिवसा न करता रात्रि करण्यात यावे,भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घाेषित करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रु. नुकसान भरपाई देण्यात यावी,कृषिपंपाचे विज बील आतापर्यंन्तचे माफ करण्यात यावे,जाहिर केलेले शेतकरी सन्मानयाेजनेतिल ६०००/- रु.शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे या विषयाचा निवेदन डॉ. अजयराव तुमसरे यांच्या नेतृत्वात साकाेली तहसीलदार यांच्या माध्यमातुन मा. मुख्यमंत्रि महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले यावेळी डॉ.अजयराव तुमसरे यांच्या साेबत असंख्य शेतकरी बांधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित हाेते।


विडियो-


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours