पुणे: महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कुठे पाणी ओसरून पुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सुरळीत सुरू करायचा आहे. त्यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये आणखी 3 मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत. यंदाच्या या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. पण या सगळ्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे.
कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चारा छावणीला भेट दिली. ज्या तरुणांनी यावेळी पूरग्रस्तांना मदत केली त्यांचं कौतुक केलं पाहिजे असही ते म्हणालेत. तर माझी कोल्हापुरात येण्याची इच्छा होती. मात्र येऊ शकलो नाही असही ते म्हणालेत. तर मराठी कलाकारांपासून ते सर्वसामान्य लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
कोल्हापूर, सांगलीतल्या पूरपरिस्थितीनंतर आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर थांबला आहे. त्यामुळे पूर ओसरण्यास मोठी मदत होईल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours