पुणे, 9 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या थिगळे कुटुंबीयांच्या घरात तब्बल 55 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. या चिमुकलीच्या जन्मामुळे  कुटुंबीयांच्या आनंदाला पारावाराच राहिलेला नाही. या चिमुकलीचं आणि तिच्या आईचं घरातल्या सदस्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केलं. राजगुरूनगरमधीर रहिवासी समीर आणि नीलिमा थिगळे यांच्या चेहऱ्यावर सध्या जरा विशेष आनंद दिसत होता. त्याचं कारणही तसेच आहे. तब्बल 55 वर्षानंतर थिगळे कुटुंबात एका छोट्या परीने जन्म घेतला आहे. या छोट्या परीला आणि आईला रविवारी (8 सप्टेंबर) वाजतगाजत घरी आणण्यात आलं.

घरचा उंबरठा ओलांडताना आई आणि लेकीचं स्वागत फुलांच्या पायघड्यांनी-रांगोळ्यांनी केलं गेलं. गावकरी, पाहुणे आणि उपस्थितांना पेढे, साखरेचं वाटप करत हा आनंदोत्सव थिगळे कुटुंबानं साजरा केला गेला. आई आणि बाळाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली गेली. कुटुंबातील महिलांनी फुगडी खेळत स्वागत केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours