मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयात 'मुंबईत दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा', असा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरासह उपनगरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मिळालेली माहिती अशी की, कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. शुभमकुमार पाल (वय-22) असे या त्याचे नाव असून त्याला गोरेगाव येथील नेस्को, आयटी पार्क येथून अटक केली आहे. त्याचा मोबाइल जप्त केला. पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय, आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS)मदतीने विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.
शुभमकुमार हा मेहरोली (दिल्ली) भागातील गढवाल संकुलात राहतो. घरात सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून तो मुंबईत आला आहे. शुभमकुमार याने दारुच्या नशेत प्रकार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली येथील एनआयएच्या मुख्यालयात गुरुवारी (29 ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास या शुभमकुमारने फोन केला. 'बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो', असे सांगून त्याने फोन कट केला होता. त्याच्या या धमकीच्या कॉलनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुभमकुमारने आधी चार वेळा पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी फोन केले होते. ATS ला त्याच्या मोबाइलमध्ये आयएसआय संघटनेचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours