मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच पश्चिम उपनगरात काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची गळती झाल्याची वृत्त आल्याने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिक अग्निशमन विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क साधत आहेत. आतापर्यंत 29 तक्रारींची नोंद महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नाहीय.
मुंबईत गॅस गळतीच्या, गॅसचा वास येत असल्याचा तक्रारी रात्री नागरिक करत होते. पोलीस,अग्निशमन दल तसेच विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी तपास करीत होते पण कुठेही काहीही आढळल नाही.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी आल्याने अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी गाड्या पाठवल्या. तसेच अन्य यंत्रणांना देखील अलर्ट केले. गॅस गळतीच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे देखील वातावरण निर्माण झाले होते. पण तपासानंतर कुठेही गळती झाली नसल्याचे समोर आले आहे. गळतीचे वृत्त नसले तरी अग्निशमन दल आणि पोलिस अलर्ट आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours