मुंबई: जनआशीर्वाद यात्रा नालासोपाऱ्यात दाखल झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरांना जोरदार आव्हान दिलंय. 'इलाका हमारा धमाका भी हमारा' असं म्हणत आदित्यनी ठाकूरांना खुलं आव्हान दिलंय. पालघर जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्याचा इरादा यावेळी त्यांनी बोलून दाखवला. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांनी नुकतंच हाती शिवबंधन बांधलंय. त्यामुळे शर्मांना हितेंद्र ठाकूरांची वर्षानुवर्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शिवसेना नालासोपाऱ्यातून उतरवण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours