मुंबई, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस राहिला असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. अशात देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) चे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019)मध्ये ते मलबार हिल (Malabar Hill) या जागेचे उमेदवार आहेत.
दक्षिण मुंबईतील सगळ्यात पॉश अशा मलबार हिल विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार असलेले लोढा हे सलग सहाव्या वेळेस निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहेत. लोढा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे 252 कोटींपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता आणि सुमारे 189 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे.
रिअल इस्टेट व्यवसायात लोढा यांचे कुटुंब


या आमदाराकडे 14 लाख रुपयांची जग्वार कार असून बॉन्ड आणि शेअर्समध्ये अन्य गुंतवणूक आहे. लोढा यांचे कुटुंबीय रिअल इस्टेट व्यवसायात असून दक्षिण मुंबईत त्यांचे पाच फ्लॅट आहेत. राजस्थानातही त्यांचा प्लॉट आहे. लोढा आणि त्यांची पत्नी यांचेही मलबार हिल भागात घर आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours