पालांदुर पोलिसांचा तपास सुरुच पण कार्रवाई शुन्य
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
लाखनी: लाखनी तालुक्यातील रामपुरी (नानोरी) ह्या गावाच्या पटाच्या दाणीवर ५ दिवसापुर्वी ७५ जनावरं (गौवंश) आणुन खुल्या आवारात विना चाऱ्यापाण्याने ते खुट्यावर बांधल्या गेलेत.नंतर अज्ञात तक्रारीवरुन पालांदुर पोलिसांना सदर जनावऱ्यांबाबतीत सुचना देण्यात आली.पालांदुर पोलिसांनी तपास सुरु केला तपासावरुन सदर जनावरं पिंपळगाव येथील सुकृत गौशाऴेतली असुन नाना जिवतोडे यांची आढळुन आली.पालांदुर पोलीसांच्या तपासात सुकृत गौशाळेमधे अपुरी जागा असल्याने सदर जनावरं रामपुरी (नानोरी) च्या पटाच्या दाणीवर आणुन ठेवले आहे असे नाना जिवतोडे यांनी पोलीसांना सांगीतले.पण ६ दिवसानंतर ही संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुनही पोलीसांना सुकृत गौशाळे तील ह्या जनावरं संबंधी काहीही हाती लागले नसुन अजुनपर्यंन्त सुकृत गौशाळे चे नाना जिवतोडे यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची  कार्रवाई करण्यात आली नसल्याने पोलीसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
--------भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलीसांकडुन विवीध गाड्यांमधुन कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यां तस्करांवर रोजंच गुन्हा नोंदविला जातो.सदर कार्रवाई केलेले जनावरं (गौवंश) यांचा योग्य पद्धतीने पालनपोशन व्हावा म्हणुन वेगवेगळ्या गौशाळेत जनावर पाठविली जातात तश्याच कार्रवाईत सुद्धा पिंपळगाव येथील सुकृत गौशाळा येथे ती जनावरं पाठवली गेली.पण सुकृत गौशाळा ही पिंपळगाव ची  असल्याने ते जनावरं (गौवंश) रामपुरी च्या पटाच्या दाणीवर अवैधरित्या कोणत्या कारणास्तवे आणल्या गेलेत हेच पोलीसांना जर माहीत पडेना? तर काय समजावे हे कळेना?
 रामपुरी परिसरात गोशाळा वाल्यांचाच गोरखधंदा:सरपंच अनिता देशमुख यांचा आरोप
-----रामपुरी ह्या गावातील सरपंच अनिता सतीश देशमुख यांनी आरोप केला आहे की रामपुरी टोलीवर काही जनावरे नेहमीच आणुन विक्री करत असतात.ह्या वेळेस काही प्रमाणात जनावरं गाय-बैल आणली आहेत त्या संदर्भात पालांदुर पोलीसांना सुचना करण्यात आले आहे.तरी आतापर्यंत कोणतीच कार्रवाई झाली नाही.व आमच्या ग्रामपंचायत कडुन कोणतीच परवानगी दिली नाही।

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours