परळी: धनंजय मुंडे तुम्हीं पुढची 25 वर्ष पडायची तयारी ठेवा. बीड जिल्ह्याच्या मोदी, मुख्यमंत्री, शहा पंकजा मुंडेच आहेत. परळीत फक्त बहिणीची हवा आहे हे भावांनी लक्षात ठेवावं अशी टीका माजी आ. सुरेश धस यांनी आपल्या खुमासदार शैलीत धनंजय मुंडेवर टीका केलीय. ते जेथे जातील तो पक्ष दुर्बीणीतुन शोधावा लागतो तर पंकजाताईच्या पक्षात मेगाभरती सुरु आहे, तर राष्ट्रवादीत  मेघा गळती सुरु आहे असा टोलाही त्यांनी लगावला. मागच्या दराने येणाऱ्याला  पुढचा दरवाजा दिसणारं नाही अशी टीकाही त्यांनी केली. ए भावा कुणाची हवा? अरे परळीत तर फक्त बहिणीचीच हवा असंही सुरेश धस म्हणाले. मतदार संघाच्याच नव्हे तर राज्याच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी करा असंही ते म्हणाले. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका केली.

ते म्हणाले, धनगर आणि मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केले आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपने दिले, धनगर समाजाला आरक्षणही आमचेच सरकार देणार आहे असे सांगत पंकजा मुंडे यांनी केलेल्या विकासाची त्यांनी माहिती दिली. माझ्या बहिणीची मतांनी ओटी भरून तिला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केलें. पंकजा मुंडे मुंडे यांनी विविध मित्रपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात त्यांची सभा झाली त्यावेळी सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी लढत असलेल्या परळी मतदार संघातील मुंडे बहीण भावाच्या लढतीची चर्चा राज्यभर आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बहीण भावाच्या संपत्ती बद्दल माहिती समोर आलीय. पंकजा मुंडे या त्यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्यापेक्षा संपत्तीने पुढे आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours