बीड, 3 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, प्रकाश सोलंके, विजयसिंह पंडित यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार हजेरी लावणार होते. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.
निवडणूक अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर बीडमधील राजकारण तापू लागलं आहे. परळी मतदारसंघात यंदा पुन्हा एकाद मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या माजलगाव आणि परळीमध्ये जाहीर सभाही होणार होत्या. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्याचा माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादीची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, रोहित पवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी!
विधानसभा निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 77 उमेदवारांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. या यादीत रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे -पाटील, संग्राम जगताप, संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादीची पहिली यादी
अजित पवार - बारामती
श्रीवर्धन - आदिती तटकरे
दिंडोशी - विद्या चव्हाण
सिन्नर - माणिकराव कोकाटे
कर्जत-जामखेड - रोहित पवार
नगर - संग्राम जगताप
येवला - छगन भुजबळ
इंदापूर - दत्तात्रय भरणे
माजलगाव - प्रकाश सोळंके
बीड - संदीप क्षीरसागर
परळी - धनंजय मुंडे
मुरबाड - प्रमोद हिंदुराव
हडपसर - चेतन तुपे
दौंड - रमेश थोरात
अणुशक्तीनगर - नवाब मलिक
गुहागर - सहदेव बेटकर
सातारा - दीपक पवार
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
फलटण - दीपक चव्हाण
पंढरपूर - भारत भालके
चिपळूण - शेखर निकम
केज - पृथ्वीराज साठे
जिंतूर - विजय भांबळे
घनसावंगी - राजेश टोपे
कागल - हसन मुश्रीफ
कोरेगाव - शशिकांत शिंदे
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
आंबेगाव - दिलीप वळसे
शेवगाव - प्रताप ढाकणे
तासगाव - सुमन पाटील
गेवराई - विजयसिंह पंडित
परांडा - राहुल मोटे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours