मुंबई : आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो.
महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. मतदानोत्तर चाचणीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा तर महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours