औरंगाबाद: एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघात शांततेने मतदान झाले. मात्र, कटकटगेट जवळील मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. मतदान केंद्राबाहेर एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदील मौलाना यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांनी अरेरावीची भाषा केली. यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आणखी संतापले. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, राज्य राखीव व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नासेर सिद्दकी यांना मारहाण म्हणजे मला मारहाण...
एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दकी यांना मारहाण म्हणजे मला मारहाण झाली असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यासह त्यांच्या समर्थकावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास त्यांना घरात घुसून मारू, असा इशाराही खासदार जलील यांनी केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours