भंडारा : कोरोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार देशात होत आहे. याची लागण झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे देशावर संकट ओढवले असून नागरिकांना यापासून वाचण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. देशभरात सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही, असे स्पष्ट केले असतानाही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी, नागरिकांच्या सुविधेसाठी संपर्क कक्ष सुरू केले असून यातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत मिळणार आहे. 

◆ भंडारा जिल्ह्याच्या संपुर्ण जिल्हा व राज्य सीमेवर चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या असुन सदर ठिकाणी चोवीस तास नाकाबंदी लावण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांशिवाय इतर कोणतेही वाहन भंडारा जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर सोडले जाणार नाही. तसेच रस्त्यावर विनाकारण व तातडीच्या बाबींशिवाय वाहने फिरविण्यास बंदी करण्यात आली आहे. जरी १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन असले तरीही सदर काळात जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा आणि अन्नधान्याचा कोणताही तुटवडा होणार नाही, याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य दुकाने दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे. 

◆ त्याप्रमाणे सदर आदेशानुसार पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांचेशी निगडित आस्थापनामध्ये कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी यांना या आदेशातुन त्यांच्या कर्तव्यार्थ प्रवास करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तरी जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा यांना भंडारा जिल्ह्याच्या भागात कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये, यासाठी भंडारा पोलिसांनी संपर्क कक्ष तयार केला आहे. जर नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी सदर संपर्क कक्षात संपर्क साधून होणारी अडचण सांगावी. या कक्षात पुढील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक खाली दिले आहे. 

 संपर्क अधिकारी :-

 पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा :
 रवीन्द्र मानकर 7020705417 

 पोलीस निरीक्षक (वाहतूक) 
 चंद्रशेखर चकाटे : मो.क्र 9130516217 

 भंडारा कंट्रोल रूम :
 1) 07184-256646 
 2) 07184-252400 

 पोलीस नियंञण कक्ष अधिकारी, भंडारा 
 एम.एच.कोरेटी : मो. क्र 9552538672 ,

◆ या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून नागरिकांनी समस्या किंवा अडचणी सांगून त्याबाबत कळवावे जेणेकरून समस्येवर त्वरित उपाययोजना करता येईल, असे आवाहन भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) अरविंद साळवे यांनी केले आहे. 

नागपुर संभाग ब्यूरो चीफ दिलिप एस देशमुख
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours