मुंबई, 15 एप्रिल : भारतात कोरोनाचा वेग वाढत आहे, आतापर्यंत कोरोनारुग्णांचा आकजा 10 हजार पार गेला आहे. यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 3 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र हे सध्या कोरोनव्हायरसच्या प्रादुर्भावाचे केंद्रबिंदू झाले आहे, आणि मुंबईचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट मानला जात आहे.

राज्यातील पहिल्या 50 कोव्हिड-19 मृतांचा आकडा पाहिल्यास यातील एकट्या मुंबईत 62.9 मृत्यू झाले आहेत. मृतांच्या या आकड्यांवरून असे दिसून आले आहे की यापैकी निम्म्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू हा एका तासाच्या आत किंवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या एका दिवसानंतर झाला आहे. यांतील अर्ध्या प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या मृत्यूच्या आधी किंवा त्यांनंतर त्यांची चाचणी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आली होती.

राज्यात कोरोनाचा वाढता शिरकाव आणि मृतांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, राज्य सरकारच्या वतीने एक समिती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे. यामध्ये कोव्हिड-19 तपासणीसाठी विलंब तर होत नाही आहे ना, हे पाहण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार प्रत्येक प्रकरणात डेथ ऑडिट करण्यासाठी तज्ञांची बैठक घेत आहे.

त्याचबरोबर गंभीर रुग्णांसाठी उपचार प्रोटोकॉल तयार करण्यासाठी सोमवारी नऊ सदस्यांची टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईतील गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी सहा रुग्णालये नेमण्यात आली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीवर आधारित इंडियन एक्सप्रेसने पहिल्या 50 मृतांचे विश्लेषण केले.

- 14 रुग्णांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांत मृत्यू झाला.-

- 26 रुग्णांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका दिवसांनी झाला.

- 11 प्रकरणांत चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत्यू झाला. तर 14 प्रकरणात पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

- यात 39 पुरुष आणि 11 महिला आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours