मुंबई, 15 एप्रिल : अफवा पसरवून संचारबंदी दरम्यान परप्रांतीय नागरिकांची दिशाभूल करुन त्यांना कुर्ला टर्मिनस तसंच वांद्रे येथे परप्रांतीयांना बोलावणाऱ्या विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याच तरुणाने सोशल मीडियावर या जमावाला वांद्रे इथं एकत्र येण्याची सूचना केली होती.

कोरोनाविरोधात लढ्यात संपूर्ण मुंबईत एकवटली आहे. सर्वजण घरातच राहून राज्य सरकारला मदत करत आहे. परंतु, 14 तारखेला लॉकडाउन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील वांद्रे परिसरात संध्याकाळी मोठ्या संख्येनं परप्रांतीयांनी एकच गर्दी केली होती. ही गर्दी जमल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. एवढंच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती.

पण, मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत गर्दी जमवणाऱ्या या भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहे. वांद्रे इथं निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सर्वांना कारणीभूत असणाऱ्या विनय दुबे या तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्यावर प्रक्षोभक वक्तव्य करणे, संचारबंदीचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, साथीचा रोग कायद्याचे उल्लंघन करणे असे विविध आरोप ठेवण्यात आले आहे.

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचयातचा अध्यक्ष आहे. त्याने उत्तरभारतीयांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी हा खोडसाळपणा केला होता. घरातच राहून त्याने फेसबुक, ट्वीटरवर वेगवेगळे व्हिडिओ टाकून एकत्र 18 तारखेला परप्रातीयांना जमण्याचे आवाहन केलं होतं. याबद्दल मंगळवारी त्याने फेसबुकवर व्हिडिओ लाईव्ह करून तशी भूमिकाही मांडली होती.

या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला ऐरोलीतून राहत्या घरातून  अटक केली. त्यानंतर त्याला वांद्रे पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours