भंडारा : ढिवर, भोई, कहार व तत्सम मच्छीमार समाजातील युवकांनी मत्स्य सहकार महर्षी माजी खा. जतिरामजी बर्वे यांचे सामाजिक कार्य पुढे पुढे न्यावे, असे प्रतिपादन एकलव्य सेनेचे सर्वेसर्वा प्रा. आलोक केवट यांनी केले आहे. 
मत्स्य सहकार महर्षी खा. जतिरामजी बर्वे यांची पहिली शतकोत्तर (१०१) जयंती  २१ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या स्वगृही साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 
प्रा. केवट पुढे म्हणाले, जतिरामजी बर्वे यांनी ढिवर, भोई, कहार व तत्सम मच्छीमार समाज विकासापासून वंचित असतांनाच त्यांनी या समाजाचे नेतृत्व करून या वंचित असलेल्या समाजाला भटक्या जमातीचे आरक्षण मिळवून दिले. मुलांना शिकता यावे, त्यांना शाळेत जाता यावे, यासाठी स्वत:चे घर दान दिले, यासारखे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य या समाजातील युवकांनी पुढे न्यावे, असे मतं त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
यावेळी मनोज केवट, संदीप मारबते, मनोज खंगार आदी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours