अमरावती, 21 एप्रिल: बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली आहे. भ्रमणध्वनी संवाद साधत झालेल्या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली आहे.
आमदार रवी राणा यांनी ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रूग्णालयाच्या टीम मार्फत घेण्यात आले होते. हे स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याचे AIIMS तज्ज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून माहिती दिली होती. तसेच त्यांचे सॅम्पल परत पाठवण्यास सांगितले होते. यापूर्वीही 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीने घेतल्याने ते नागपूर येथील AIIMS ने रिजेक्ट केले.
आमदार रवी राणा यांनी आता याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हे महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करतात तर जिल्हाधिकारी केबिनच्या बाहेर निघत नसल्याची तक्रारीत म्हटलं आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार रवी राणा व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संभाषणाचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours