क्राईम रीपोटर.. सदीप क्षिरसागर
लाखनी:- तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोसेखुर्द प्रकल्प (इंदिरा सागर) प्रकल्पाच्या नेरला उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहाराचे बांधकामाचे काम सुरू असून त्या कामावर परप्रांतीय मजूर कामावर असून त्या मजुरापैकी तरुण मजुराने जांभळाच्या झाडाला दुपट्टयाने गळफास घेतल्याची
घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.विमलेश जगन्नाथ सहनी वय २४ रा. सुहईगढ तालुका रुनीसैदपुर जिल्हा सीतामढी (बिहार) असे मृत मजुराचे नाव आहे.
धाबेटेकडी येथे नहराचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून तिथे जवळपास ३०-३५ मजुर गेल्या ६-८ महिन्यापासून कामावर आहेत. रात्री सहकार्यांसोबत जेवण केल्यानंतर सर्व झोपी गेले.
सोमवारी (ता. २७) ला सकाळी गावातील नागरिक शेताकडे गेल्यावर नहराजवळ त्यांना मृतक विमलेश झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. मृतक अनोळखी असल्याने त्यांनी मजुरांची निवास व्यवस्था असलेल्या कॅम्प ला संगितले तेव्हा त्यातील मजुरांनी मृतक यास ओळखत असल्याचे संगितले.
घटनेची माहीती लाखनी स्टेशन ला देण्यात आली. लाखनीचे पोलीस निरीक्षक दामदेवजी मंडलवार यानी घटनेची माहीती मृतकाच्या नातेवाईकांना दीली तेव्हा नातेवाइकांनी लॉकडावून मुळे येता येनार नाही व मृतदेह नेता येत ऩसल्याने तिकडेच अंतिम संस्कार आटोपण्याची विनंती केली
घटनास्थळावरुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले
मरनाचे नेमके कारन कळु शकले नाही. लाखनी पोलिस स्टेशन मध्ये मर्ग दाखल केला असुन पुढील तपास लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेवजी मंडलवार यांच्या मार्गदर्शनात विजय हेमणे व पोलिस शिपाई नितिन झंझाड करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours