रीपोटर... संदीप क्षिरसागर
गराडा बफर झोन घोषित 
       भंडारा,दि. 27 –  क्षयरोगाच्या आजाराने आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णाचा  घश्यातील स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली. कोरोना आजाराची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आली होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु  बोदवड उपस्थित होते. पाझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे वय  45 वर्ष असून  भंडारा तालुक्यातील गराडा येथील रहिवासी आहे. सदरहु रुग्ण 23 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला असून तात्काळ त्याच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. आज दिनांक 27 रोजी सकाळी अहवाल प्राप्त झाला असून तो पाझिटिव्ह आहे. त्यामुळे गराडा गावालगतचा 5 किलोमिटर क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात आता घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णाचे परिवारातील तसेच संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
  जिल्हयात पॉ‍झिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांनी  कारोना उपाययोजनेच्या निर्देशाप्रमाणे दुकाने व इतर आस्थापना यांना सूचना दयाव्यात, असे त्यांनी सांगितले. काही उद्योग सुध्दा बंद करण्यात येणार आहेत. गराडा बु., गराडा खुर्द, मेंढा, बासोर, बोरगाव बु (पुनर्वसन) हा परिसर पुढील आदेशपर्यंत प्रतिबंधित (सिल) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करून सीमा आवगमनासाठी बंद करण्यात येत आहेत. प्रतिबंधित भागातील नागरिकांना क्षेत्राबाहेर जाण्यास तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे  कोरोनाचा धोका असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येणार आहे, असे  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours