मुंबई, 24 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा प्रवाशांसाठी सुरू होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अद्यापही संभ्रम कायम आहे. इथल्या नागरिकांना आणखीन 7 दिवस विमानातून प्रवास करण्यासाठी आणखीन 7 दिवस वाट पाहावी लागणारर असल्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील विमानसेवा सोमवार सुरू करण्यास स्थगिती दिल्याची माहिती मिळाली आहे.
एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी सोमवारपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. विमान सेवा सुरू झाली तर किमान 27 हजार 500 प्रवासी रोज प्रवास करणारे असतील. अशा परिस्थितीत विमानतळ व विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांची जास्त गरज भासणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षितता हे सर्वात मोठं आव्हान असेल. त्यासोबतच राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला स्थगिती असल्यानं प्रवाशांचीही गैरसोय होईल असं कारणही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours