नागपूर : खाकी वर्दीतली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत तर बेवारस मृतदेहांची गोष्टचं वेगळी. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार? या प्रश्नाला उत्तर म्हणून महाराष्ट्र पोलीस पुढे आले आहेत. बेवारस मृतदेहांवर किंवा ज्यांचे नातेवाईक परराज्यात अडकले आहेत आणि ते अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही, अशा मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस पुढे आले आहेत.
कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले पोलीस आपण पाहिलेच आहेत. मात्र, पडद्यामागे सुद्धा पोलिसांची सामाजिक बांधिलकीचं उदाहरण समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लोक एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. अशा परिस्थितीमध्ये बेवारस किंवा जे एकटेच राहतात आणि त्यांचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात आहेत. लॉकडाऊनमुळे ते पोहचू शकत नाही, अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोण पुढे येईल असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसच समोर आले आहेत.
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
मुंबई पोलीस दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा अशा मृतदेहांवर अंत्यविधीची जबाबदारी पार पाडली. वांद्रे पोलीस स्टेशन येथील रि. टा. गुप्ता यांनी 2005 मध्ये मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला आणि दोन मुलं पाण्यात बुडू लागली. रिटा गुप्ता यांनी मुलांचे प्राण वाचवले. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी याबद्दल रिटा गुप्ता यांना दिल्लीला बोलवून त्यांचा सत्कारही केला. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा रिटा गुप्ता जे आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. एक अशीच सामाजिक बांधिलकी जपत बेवारस मृतदेहांवर स्वतः अंत्यसंस्कार करून आपली जबाबदारी पार पाडली. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुण अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. इतकं होऊन सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावाला न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या संध्या सिल्वन्त यांनी आत्तापर्यंत सात बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours