मुंबई, 10 मे : भारतीयांसाठी महत्त्वाचा हंगाम म्हणजे मान्सून. या 4 महिन्यांचा कालावधीमध्ये पाऊस चांगला झाला खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन चांगलं येतं. मात्र गेल्या काही वर्षांपान्सून हवामानात सतत्यानं बदल होत आहेत. अवेळी येणारा मान्सून आणि अवकाळी पाऊस यासोबतच येणारी वादळं त्यामुळे होणार शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना पाहायला मिळतो. पाऊस चांगला झाला तर भात आणि गहू उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि चांगलं होतं.

सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. 1 जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झाले आहेत.

यंदा मान्सून 1 जूनलाच दाखल होणार आहे यामध्ये कोणताही बदल नसेल. पण काही राज्यांमध्ये मान्सूनचा प्रवासाची वेळ बदलली आहे. स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून 3 ते 7 दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही 15 जुलैऐवजी 8 जुलैला मान्सून दाखल होईल.

दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला धडकण्याची शक्यता आहे. तर यंदाचा मान्सून 29 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोबरपर्यंत मुक्काम करेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours