रीपोटर... संदीप क्षिरसागर

भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झाली १४ पोलिस विभागासह प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील नागरीकांची  चिंता वाढलेली आहे

भंडारा- जिल्ह्यात दिवसगणीक रेड झोनमधून येणार्‍या नागरिकांची संख्या वाढली असून, अशातच प्रत्येक दिवसाला कोरोना बाधितांची संख्येत वाढ होवून भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १४ वर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सुरूवातील ९ होती. परतू, जिल्ह्यात दिवसगणीक रेड झोनमधून येणार्‍या नागरिकांची संख्या वाढल्याने,बाधित रूग्णांच्या संख्येत भर पडतच आहे. त्यात जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या लाखांदूर तालुक्यातील एक (२९) वर्षीय तरूण , साकोली तालुक्यातील ( ३२ ) वर्षीय व्यक्ती तसेच भंडारा शहरातील चांदणी चौक येथील (४३ वर्षीय) व्यक्ती त्याचप्रमाणे मोहाडी तालुक्यातील वरठी येथील एका तरूणीचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जवाहरनगर खरबी नाका (चेकपोष्ट) येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याला सुध्दा कारोनाची लागण झाली असल्याने, आता भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ वर पोहचली आहे. याअगोदर यातील एक महिला रूग्ण आधिच बरी झाली आहे.
एकंदरीत कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस विभागासह प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली असून, जिल्हा प्रशासन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours